पिंपरी (Pclive7.com):- नवीन आहे, पण शरद पवार साहेब आणि अजितदादांनी जसा बारामतीसह पिंपरी चिंचवडचा विकास केला, त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी दिली.
मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे जाहीर मेळावा संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे आदी उपस्थित होते.
मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. हे माझं पहिलं भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा. या भाजप, शिवसेना सरकारने अत्यंत चुकीची कामे केलीत. पक्षाने माझ्यावर उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. बारामतीचा विकास शरद पवार साहेब, अजितदादांनी केलायं. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभा मतदार संघाचा विकास करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादा, पवारसाहेबांचा पाठींबा मला सदैव असणार आहे. आमच्या परिवाराच्या पाठीशी उभे रहा अशी साद पार्थ यांनी घालत मावळचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.






















Join Our Whatsapp Group