पिंपरी (Pclive7.com):- गॅस कटरच्या सहाय्याने दोन एटीएम मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना भोसरी येथे घडली.
सचिन शिवकरण काळगे (वय २१, रा.बापूजीबुवा नगर, थेरगाव) यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धावडेवस्ती भोसरी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम आहेत.
शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान एटीएम सेंटरमधील दोन एटीएम मशिन गॅस कटरच्या साहाय्याने कापले. त्यातील ३५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group