पिंपरी (Pclive7.com):- होळीच्या निमित्ताने पार्थ आणि रोहित पवार बंधूंनी एकत्रित येत त्यांच्याबद्दलच्या वायफळ चर्चाचं दहन केलं. पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकारामनगर येथे पार्थ आणि रोहित यांनी होळीचं पूजन केलं. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, पक्ष प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघातून आजोबा शरद पवार यांनी माघार घेत, पार्थ यांच्या मावळमधील उमेदवारीचा मार्ग मोकळा केला होता. तेव्हा आजोबांनी पुनर्विचार करण्याची जाहीर विनंती रोहित यांनी केली होती. रोहित यांच्या फेसबुक पोस्टमधील विनंतीमुळे पार्थ-रोहितमध्ये वादाचा रंग असल्याची चर्चा राज्यभर रंगली. सोशल मीडियावर तर या पवार बंधूंवर टीकांचे फवारेही उडवले गेले.
होळीच्या निमित्ताने पार्थ आणि रोहित यांनी एकत्र येऊन वादाच्या चर्चांचं दहन केलं आणि सर्वांची बोलती बंद केली. आजोबा आणि बाबांनंतर आता पार्थ यांच्यासाठी भाऊही मैदानात उतरला आहे. सध्या सोशल मीडियावर विविध अंगांनी प्रचाराचे रंग उधळणारे पार्थ जाहीर सभेत फिके पडत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण आता रोहित यांच्या फवाऱ्यांनी जाहीर सभेतील ही कमतरताही भरुन निघेल हे नक्की..
























Join Our Whatsapp Group