पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या विजयासाठी पिता अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. राज्यात एकीकडे बड्या नेत्यांची मुले भाजपात जात असताना, शहर भाजपातील बडे नेते आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी स्वत: अजित पवार यांनी आझम पानसरेंची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांनी देखील पानसरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आझमभाईंचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आज आझमभाईंचा प्रवेश न होता त्यांचे पुत्र निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पानसरेंची शहरात तसेच मावळ मतदार संघात मोठी ताकद आहे. त्यांना मानणारा वर्गही शहरात मोठ्या संख्येने आहे. निहाल यांच्या प्रवेशाने शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून मावळच्या रणसंग्रामात पार्थ पवार यांना त्याचा नक्की फायदा होणार आहे.
























Join Our Whatsapp Group