पिंपरी (Pclive7.com):- सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपळे सौदागरमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप बदलून नवीन पाईप टाकण्यात येणार असून या परिसरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. स्थानिक नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे व नगरसेवक शत्रुघ्न बापु काटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे याकामाची सुरूवात झाली आहे.
अमृत योजनेअंतर्गत पिंपळे सौदागर गावठाण परिसर व शिव साई लेन (लोटस हॉस्पिटल रोड) येथील ८ वर्ष जुन्या पिण्याची पाईप लाईन बदलून नवीन ४०० मिली मीटरचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरीकांच्या पाणी समस्ये विषयीच्या वाढत्या तक्रारीमुळे नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी २०१७ मध्ये स्थायी समिती सदस्य असताना या कामासाठी अमृत योजनेअंतर्गत पुरेश्या निधीची तरतुद मंजूर करून घेतली होती. पिंपळे सौदागरचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असून त्याअनुषंगाने प्रभागात विकासकामे जोमाने सुरू आहेत. नुकतेच या प्रभागात नव्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकींचे भूमीपूजन झाले आहे. आता जुन्या पाईप बदलण्याचे काम सुरू झाल्यामुळे भविष्यात या प्रभागातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group