देहू (Pclive7.com):- निवडणुका म्हटलं की प्रत्येक उमेदवार विजयासाठी देवाला साकडे घालतात. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव व्हावा ही भावना मनामध्ये नक्कीच असते. आज तुकाराम बीज निमित्त दोन प्रतिस्पर्धी एकाचवेळी एकाच मंदिरात साकडे घालायला आले होते. मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे या दोघांनीही आज एकाचवेळी मंदीरात प्रवेश केला.
देहूत आज तुकाराम बीजनिमित्त वारकरी संप्रदाय जमला आहे. संकटातून मुक्त करण्यासाठी हे वारकरी तुकोबांच्या चरणी माथा टेकवत आहेत. तिथेच पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी एकाचवेळी लोकसभेत यश मिळावं म्हणून साकडं घातलं. आता तुकोबा कोणाला प्रसन्न होतील हाच प्रश्न अखंड वारकरी संप्रदायासह उपस्थित भक्तांना यानिमित्ताने पडला आहे.
























Join Our Whatsapp Group