पिंपरी (Pclive7.com):- राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या निवडणुकीत काय भूमिका असणार हे पक्षप्रमुख राज ठाकरे गुढी पाडव्याच्या जाहिर मेळाव्यात स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे मनसैनिकांवर मोठी जबाबदारी पडणार आहे. या निवडणुकीत आपली भूमिका निर्णायक असून मनसेची ताकद दाखवून असे मत मनसेचे सरचिटणीस तसेच पिंपरी चिंचवडचे प्रभारी किशोर शिंदे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी पिंपरीत पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना किशोर शिंदे बोलत होते. यावेळी सर्व विभागाचे शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किशोर शिंदे म्हणाले की, मनसेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांने केलेल्या कामाची दखल घेतलीच जाते. महाराष्ट्रात राज ठाकरे हे एकमेव असे नेते आहे कि ज्याने एक हाक मारली तर लाखो लोक जमा होतात. आपण कोणासोबत काम करतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. इलेक्शन लढत नसतानाही राजसाहेबांवर टिका करण म्हणजे मताचा टक्का विरोधकांना कमी होईल अशी भीती वाटते. राजसाहेबांच्या भाषणाचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या ताकतीच महत्व आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या पक्षप्रमुखांवर टिका केल्याचा, अपमान केल्याचा राग येत नसेल तर आपण मनसैनिकच नाही असे समजावे. राजसाहेब जो आदेश देतील तोच आपल्यासाठी अंतिम असेल. आम्ही जरी कमी असलो तरी ज्याच्या पारड्यात आपले वजन पडेल त्याचं पारडं जड होणार आहे, त्यामुळे आपल्या वजनाला किंमत आहे.
मनसेचे उपाध्यक्ष रणजितदादा शिरोळे म्हणाले की, गुडीपाडवा मेळावा व लोकसभा निवडणूक यांचा मेल आहेच. पुढील दिशा काय असेल हे राजसाहेब मेळाव्यात सांगतील. दुष्मन का दुष्मन आपला दोस्त ह्या प्रमाणे वागावं लागेल. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या फेसबुक पोस्ट नक्की वाचा, यातून आपले ज्ञान अपडेट करा. भाजप,मोदी व शहा हे आपले खरे विरोधक आहेत. इतर पक्ष आमिष दाखवतील आपण त्याला बळी पडू नये. ज्यांना राजसाहेबांचे विचार पटतात अशा सर्वांनी मेळाव्याला यावे असे आवाहन त्यांनी केले.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, राजसाहेबांना आपण सर्वांनी मिळून ताकत द्यावी. पक्ष बांधणीचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. येणाऱ्या दिवसात मनसेचे शहरातील चित्र बदललेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे म्हणाले की, राजसाहेब जे काही करतील ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच असणार अाहे. मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.





















Join Our Whatsapp Group