पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरणातील ज्येष्ठ समाजवादी ज्ञानदेव लक्ष्मण शिंदे उर्फ डी.एल.शिंदे यांचे गुरूवार दि.२८ रोजी दुखःद निधन झाले आहे. ते ७४ वर्षाचे होते. सर्वेषां सेवा संघ या अनाथ आश्रमाचे ते संस्थापक होते. पिंपरी चिंचवड भाडेकरू पंचायतीचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. बजाज अॉटो कंपनीचे कामगार नेते म्हणून त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली होती. जनता पक्षात त्यांनी अनेकवर्षे कार्य केले. आणिबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवास देखील भोगला होता. प्राधिकरणातील दुर्गाटेकडी येथील सुप्रभात मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांचे चिरंजीव निलेश शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
सोमवार दि.१ एप्रिल रोजी निगडी येथे त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होणार आहे.





















Join Our Whatsapp Group