मुंबई (Pclive7.com):- राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मोठ्या सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी युतीच्या नेत्यांनी तयारी सुरू केली असून राज्यभरात ३० दिवसांत सुमारे १ हजार सभा आणि रोड शो घेण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील भाजप नेते या सभा घेणार आहेत.
राज्यभरात ३० दिवसांत सुमारे १ हजार सभा आणि ‘रोड शो’ चे आयोजन करण्यात येणार आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मोठे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा १ एप्रिल रोजी विदर्भातील वर्धा येथे आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ मार्चपासून कोल्हापुरातून युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री विनोद तावडे यांच्यासुध्दा सभा होणार आहेत.
























Join Our Whatsapp Group