पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. परंतू अपुरी पोलीसांची संख्या आणि वाहनांची कमतरता यामुळे मोठी कसरत पोलीस आयुक्तांची होत होती. दरम्यान महासंचालकांनी सीएसआर फंडातून नवीन वाहने देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार आज वोक्सवँगन कंपनीतर्फे सीएसआर फंडातून आयुक्तालयाच्या ताफ्यात ५ नवीन मोटारी देण्यात आल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आणखीन वाहने पोलीसांच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
वोक्सवँगन कंपनीचे सीएसआर हेड पंकज गुप्ता यांनी गुरूवारी सकाळी अकरा वाजता पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे या वाहनांच्या चाव्या सुपूर्त केल्या. यावेळी कंपनीचे अकांऊट हेड कौशिक बासू, बी.यु.भंडारी शोरूमचे हेड बाळासाहेब सहाने, डिलरशिपचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश भंडारी, सरव्यवस्थापक वैजंती शेवाडे, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group