पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सिमेंटच्या जंगलातही लहान मुले व तरुण नागरिकांना जंगलातील प्राण्यांचे हुबेहूब दर्शन घडवण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभाग सज्ज झाला अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीसमोरील भुयारी मार्गाचे पेंटिंगद्वारे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.

पिंपरीगाव व डेअरीफार्म कडून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व वल्लभनगर एसटी स्टँडकडे जाण्यासाठी तयार केलेल्या कै. संदीप वसंतराव शेवडे भुयारी मार्गाच्या दुतर्फा महापालिकेच्या पर्यावरण विभागांतर्गत भुयारी मार्गाचे सुशोभीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे.

यामध्ये वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, अस्वल या हिंस्र प्राण्यांसह हरीण, काळवीट हे प्राणी व डोंगरदऱ्या, टेकड्या यांचे हुबेहूब रेखाटन करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून येणार्या जाणारे वाहन चालक व प्रवाशांसह लहान बाळ गोपाळ आवर्जून थांबून या कृत्रिम निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आहे. येथे मत्सालया प्रमाणे एक्वेरियम चित्र रेखाटण्यात येणार असून विविध रंगातील मासे शहरवासीयांना पाहायला मिळणार आहेत. इंद्रायणीनगर येथील स्पाईन सर्कल येथे देखील अशाच प्रकारे भिंती रंगविल्या आहेत. तेथे कार्टून चित्रे भिंतींवर साकारण्यात आल्यात.





















Join Our Whatsapp Group