पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप या शहराने पाहिले आहे. आता एेंन निवडणुकीच्या तोंडावर या दोन मंडळींचे झालेले मनोमिलन म्हणजे लोकनाट्य तमाशा सुरू असल्याची टिका सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.
मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी लक्ष्मण जगताप जगताप यांच्यावर केलेले आरोप मागे घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले. त्यांच्यात झालेल्या ‘मनोमिलन’चा मारूती भापकर यांनी सडकून समाचार घेतला आहे. भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरंग बारणे आमदार लक्ष्मण जगताप यांचे एकमेकांना शह-काटशह देत कुरघोडीचे राजकारण करीत आले आहेत. आजवर बारणे आणि जगताप यांनी ऐकमेकांवर अनेक आरोप केलेत. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना ही घरे देण्यासाठी की घरे भरण्यासाठी? ४२५ कोटी रूपयांच्या रस्ते विकासाच्या कामात भाजपाचा ९० कोटीचा घोटाळा, लक्ष्मण जगताप यांना सत्तेची धुंदी, टी.डी.आर माफियांचा, नदीपात्र चोर म्हणून जगताप यांच्यावर जाहीर आरोप केले. तर आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा श्रीरंग हा ‘नटरंग’ आहे, माती चोर आहे, बारणेंनी प्राधिकरणांचे भुखंड ढापले, फोटोवाला खासदार, मावळचा मावळता खासदार, लोकसभा निवडणुकीत बारणेना जनताच घरी बसवेल. अशी शेलकी विश्लेशने वापरुन जगताप यांनी जहरी टिका केली. या आरोप प्रत्याआरोपाची जुगलबंदी शहराने अनुभवली या कलगितुऱ्यांना सर्व माध्यमांतून खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत स्व.काळूबाळूं लोकनाट्य तमाशाला मागे टाकेल. असा भाऊ सांगवीकर सह आप्पा थेरगावकर यांच्या बहूरंगी, बहूढंगी लोकनाट्य तमाशाने जनतेची करमणुक केली. आणि या तमाशाचे वगनाट्य “अशी ही बनवाबनवी” हे ही खूप गाजले. मात्र राजकरणात असे घडू शकते. हे मान्य…
मात्र २०१७ महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. भय भ्रष्टाचार महापालिका ही घोषणा देऊन भाजपाने मते घेऊन सत्ता संपादन केले. सत्ताधीरी भाजपाने कारभाराची सुरुवात करतानाचं ३१ मार्च नंतरची ठेकेदारांची बिले अडवून त्यातून टक्केवारीच्या गैरव्यवहाराचा श्री गणेशा केला. भक्ती शक्ती उड्डाणपूल ग्रेडसेप्रेटरचे १०० कोटीच्या कामातील गैरव्यवहार, पालखी सोहळ्या ताडपत्री खरेदी गैरव्यवहार, शहरातील कचरा उचलण्याची व वाहतूकीची सुमारे ४०० कोटीच्या निविदेतील गैरव्यवहार, पंतप्रधान आवास योजनेच्या र.रु. ४१० कोटी रकमेच्या निविदेतील गैरव्यवहार, रस्ते विकासाच्या र.रु. ४२५ कोटीच्या निविदेतील ९० कोटीचा गैरव्यवहार, मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गैरव्यवहार, चिखली टाळगाव येथील संत पीठातील कामाच्या निविदेतील गैरव्यवहार, सुरक्षा व आरोग्य कर्मचा-यांच्या ठेक्यातील गैरव्यवहार, मागील २ वर्षात सुमारे ५३०० कोटीच्या रकमेचा टी.डी. आर वाटप, यातील अनेक विषयाबाबत आम्ही पंतप्रधान मुख्यमंत्र्याला तक्रारी दिल्या. त्याला माध्यमातून प्रसिध्दी मिळाली. त्यातूनच खासदार, आमदार व शिवसेनेच्या पदाधिका-यांनी ही तक्रारी केल्या. मागील २ वर्षात सत्ताधारी भाजपवाले करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे टाकत होते. ते रोखण्यासाठी लोकप्रतीनिधी म्हणून खासदार, आमदार व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रारी केल्या. त्याचे आम्ही स्वागत केले.
मात्र लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मनोमिलन होत असताना आपली खुर्ची वाचविण्यासाठी या सगळ्या तक्रारी बिनाशर्त मागे घेऊन खासदार बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पायी अशर:हा लोटांगण घातले. तर तिकडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांच्या पायी अशर:हा लोटांगण घातले. याचा सरळा अर्थ आहे की, भ्रष्टाचाराच्या विरोधातील खासदारांचा लढा सस्पसेल बोगस होता. मागील २ वर्षातील शहरातील भ्रष्टाचारांच्या आरोपांचे मनोमिनल झाले आहे. आता त्यातील हिस्सेदारीच्या टक्केवारीचे प्रमाण व लेखाझोका खासदार व आमदार यांनी जाहीर करावे. व्यक्तीगत आरोप प्रत्याआरोप करणे, मागे घेणे, याचाशी आमचा काही मतलब नाही. मात्र वरील जनतेच्या संबंधीत विषयावर अशा प्रकारे स्वत: च्या स्वार्थासाठी माघार घेऊन त्यातून अर्थ लाभ करुन घेणे. हा सरळ सरळ जनतेशी द्रोह आहे. ही जनतेच्या डोळ्यात नुसती धुळफेक नसून माती फेक आहे. खासदार व आमदार यांची ही बोगस भुमीका सुजान, विवेकी व सजक नागरिकांना कधीच आवडणार नाही. त्यामुळे या भुमिकेबाबत खासदार, आमदारांना जनताच माफ करणार नाही. हे मात्र नक्की… असे मारूती भापकर यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group