मावळ (Pclive7.com):- मतदान करून नवीन वैवाहिक आयुष्यास सुरुवात करा, अशा शुभेच्छा शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदर मावळ मधील सावळा गावातील नवदांपत्यास दिल्या. प्रचार दौऱ्यादरम्यान सावळा गावातील भोजणे-घोईरत परिवाराचा साखरपुड्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, सभापती सुवर्णा कुंभार, महिला अध्यक्षा नंदा सातकर, शुभांगी दरेकर, तालुका अध्यक्ष राजू खांडभोर, भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदर मावळ मधील सावळा गावातील काळूराम घोईरत यांची कन्या सोनाली आणि आंबेगाव तालुक्यातील शिणवली गावातील दशरथ भोजणे यांचे सुपुत्र शशिकांत यांचा आज (शुक्रवारी) साखरपुडा झाला. आंदर मावळात खासदार बारणे यांचा प्रचार दौरा सुरु असताना सावळा गावात झालेल्या कार्यक्रमास बारणे यांनी हजेरी लावली. नवदांपत्य नवीन आयुष्याची सुरुवात त्यांनी मतदान करून देशाच्या भवितव्यात आपले योगदान देऊन करावी, असे आशीर्वाद त्यांनी वधू-वरास दिले. प्रचाराची धामधूम सुरु असताना सामाजिक भान जपत बारणे यांनी मतदान करण्याचा संदेश दिला. दरम्यान त्यांनी पिंपरी बुद्रुक, माळेगाव, अनसुटे गावांना भेटी दिल्या.






















Join Our Whatsapp Group