पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर काँग्रेसच्या वतीने रेणुका शिशुगृह येथे बाल साहित्य व बाल आहाराचे वाटप करण्यात आले.

चऱ्होली वडमुख वाडी येथील श्री रेणुका महाजन ट्रस्ट संचलित रेणुका शिशुगृह या अनाथ शिशु, उपेक्षित शिशु, पुनर्वससित शिशु गृहामध्ये आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन तेथील बालकांना आवश्यक असणारी औषधे, डायपर, बिस्किटे, दलिया, गायीचे तूप, दूध पावडर, पौष्टिक आहार संस्थेच्या प्रतिनिधी रंजना शिंदे आणि पूनम खेडेकर यांच्याकडे सुपूर्त केला.
या शिशुगृहामध्ये बेवारस सापडलेली, पोलीस कारवाई द्वारे सापडलेली, लहान अबोध मुले, बालके यांचा संगोपन केले जाते, या ठिकाणी सध्या २० बालकांचा सांभाळ केला जातो या ठिकाणी सर्वात कमी दोन पंधरा दिवसांची नवजात बालके आहेत.

सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा या ठिकाणी सांभाळ केला जातो दरम्यान ती काही नागरिकांकडून दत्तक घेतलीच जातात तर सहा वर्षां नंतर बालके इतर संस्थेत हस्तांतरित केली जातात. हे शिशुदत्तक गृह म्हणून देखील ओळखले जाते.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी सरचिटणीस हरीश डोळस, हिराचंद जाधव, विल्यम साळवी, सदाशिव तळेकर, कुणाल भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group