पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमिताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच राज्यस्तरीय कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. मुंजोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.” ग्रामदैवत मुंजोबा महाराज केसरी २०१९” या कुस्ती स्पर्धेत अंतिम लढत पै विष्णू खोसे विरुद्ध पै. समीर देसाई यांच्यात लढत झाली अवघ्या तीन मिनिटात  पै. विष्णू खोसे याने पै समीर देसाई याला आसमान दाखवत चीतपट करून  “मुंजोबा महाराज केसरी २०१९ किताब पटकावला.”