मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातल्या डोणे गावातील अशोक वाडेकर या तरूणाने विवाहस्थळी जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर प्रवास केला. या एक तासाच्या प्रवासासाठी त्याने तब्बल ७५ हजार रूपये मोजले.
अशोक वाडेकर हा शेतकरी पुत्र आहे. त्याच्या दिवंगत वडिलांची खूप इच्छा होती की आपल्या मुलाने हेलिकॉप्टरमधून नव्या नवरीला आणावं. त्यांची हीच इच्छा त्यांच्या मुलाने अशोक वाडेकर या तरूणाने पूर्ण केली आहे.
८ मे रोजी साजरा झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी नवरदेवाने हेलिकॉप्टरचा वापर केला. डोणे गावातून शिवपार्वती लॉन हिंजवडी (पुणे) येथे जाण्यासाठी त्याने हेलिकॉप्टरचा वापर केला.
मुळशीच्या घोटावडे गावातील पुजा देवकर या तरूणीशी ८ मे रोजी अशोक वाडेकर विवाहबद्ध झाला. शेवटी काय हौशेला मोल नसतं, एवढंच खरं….!




















Join Our Whatsapp Group