पिंपरी (Pclive7.com):- समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लग्नगाठ बांधणे हे वाटते तेवढे सोपे नसते. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी हा विवाह सोहळा थाटात करताना लहान सहान गोष्टींसाठी होणारे खर्चही त्यांच्यासाठी आवाक्या बाहेरचे ठरतात. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कै. प्रशांत शेट्टी, कै. शंकर शेट्टी आणि कै. शांता शेट्टी यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्त सर्व जाती-धर्मातील वधू-वरांचे सामुदायिक विवाह लवकरच घेण्यात येणार आहे. त्यासाठी वधू-वर किंवा त्यांच्या पालकांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सामुदायिक विवाह सोहळ्याचे सतरावे वर्ष आहे त्यामध्ये १५० जोडप्यांना लग्नगाठ बांधली गेली आहे. आपण समाजाचे देणे लागतो. समाजाचे ऋण फेडणे आवश्यक असल्याने व या विवाह सोहळ्यामध्ये आलेल्या कुटूंबाला आपले कुटुंब मानून त्यांच्या आयुष्याची व भविष्याची वाटचाल चांगली झाली पाहिजे. रक्ताची नाती नसली तरी हि नाती द्रृढ झाली पाहिजेत म्हणून हा विवाह सोहळा आयोजित केला जातो. या विवाह सोहळ्यात आयोजकांच्या वतीने विवाहेच्छूक वधू वरांना विवाहासाठी विविध सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहे.
नगरसेवक शीतल शिंदे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आणि प्रशांत शेट्टी प्रतिष्ठान, यशस्वी मित्र मंडळ, सुर्योदय फाऊंडेशन, ठाकुरदास वाधवाणी सोशल फाऊंडेशन यांचा मोठा सहभाग असणार आहे.
दरम्यान, आयोजकांच्या वतीने सर्व जाती-धर्मातील वधू-वरांचे विवाह लावून देणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नगरसेवक शीतल शिंदे यांच्या चिंचवडगाव, श्रीधरनगर येथील जनसंपर्क कार्यालय आणि चिंचवड स्टेशन येथील माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्या संपर्क कार्यालयात विवाह नोंदणी करण्यात येणार आहे, तरी 7776002424 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
शीतल शिंदे
नगरसेवक, पिंपरी चिंचवड
महापालिका :9850905033
प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक : 9923203680






















Join Our Whatsapp Group