पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरा लगतच्या संरक्षण खात्याच्या सीक्यूएई भागातील जंगलात रविवारी पहाटे दि. 12 सोमवारी दि. 13 मे रोजी सकाळी बिबट्याचा वावर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सांगवी फाटा व संरक्षण खात्याच्या कार्यालयाच्या परिसरातील जागेत प्रचंड झाडे आहेत. सीक्यूएई येथील कर्मचाऱ्यांना तसेच संरक्षण खात्याच्या आसपास असलेल्या जुनी सांगवीतील मधुबन पिंपळ निलख व जिल्हा रुग्णालय वसाहत परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात सीक्यूएई प्रशासनाकडून अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
औंध कॅम्प जुनी व नवी सांगवीचा परिसर चारही बाजूने नदी व संरक्षण खात्याच्या जागा आहेत. त्यातील काही भाग जंगल प्रमाणे देखील आहे. दरम्यान वनविभागाला सीक्यूएई प्रशासनाकडून ही बाब कळविण्यात आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी येथील परिसरात वनविभागाकडून लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी डी.पी.सना यांनी दिले आहे.






















Join Our Whatsapp Group