बालेवाडी (Pclive7.com):- मावळ शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशी लढत झाली. तर शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे डॉ.अमोल कोल्हे यांच्यात बहुचर्चित सामना झाला. या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे. साधारणत आठ ते साडेआठ वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होऊन पहिला कल समोर येणार आहे. प्रत्येक फेरी नुसार अचूक आकडेवारी पिंपरी चिंचवड लाईव्ह न्युज अर्थात Pclive7.com वाचकांसमोर देणार आहे.





















Join Our Whatsapp Group