पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे राज्य शासनाच्या वनविभागाच्या जागेत कचरा डेपो सुरू करण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी कचरा डेपो सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे येथे कचरा डेपो सुरू करू नये अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केले आहे.
पुनावळे परिसरातील रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेजारीच हिंजवडी आयटी पार्क आहे, येथे कचरा डेपो केल्यास या भागातील विकासावर त्या अनुषंगाने शहराच्या विकासावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
शहरातील प्रत्येक वार्डात त्या-त्या भागातील कचरा तेथेच जिरविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने उपाययोजना करावी. महापालिकेने तसा निर्णय घ्यावा, परंतु पुनावळे येथे कचरा डेपो करू नये. त्यास स्थानिक रहिवाशांकडून विरोध केला जाईल असा इशारा मयूर कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.





















Join Our Whatsapp Group