पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथे विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत तलवारींचा नंगा नाच करण्यात आला. तसेच मुलींनी एअरगनमधून फायर केले. या प्रकरणी रविवारी (दि.२) मध्यरात्री निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते बाराच्या दरम्यान अकुंश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान घडला.

याप्रकरणी पोलिस शिपाई विकास दुधे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितिन वाटकर यांच्यासह अन्य २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय हत्यार बंदी कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी निगडी परिसरात शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यासाठी कोणताही परवाना घेण्यात आला नव्हता. शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींच्या हातामध्ये एयरगन होत्या. मुली एयरगन मधून फायर करून आवाज करीत जात होता. तर काही मुली तलवारींचा नाच करत होत्या. पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत.





















Join Our Whatsapp Group