पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोहननगर चिंचवड येथील अहिल्यादेवी होळकर रूग्णालयास धनगर समाजाकडून अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा पुजन करुन भेट देण्यात आली.
मोहननगर येथील दत्तनगर भागात या रूग्णालयाची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली. या रूग्णालयास अहिल्यादेवी होळकर हे नाव देण्यात आले होते. या रूग्णालयात महापुरूषाची प्रतिमा आहेत, परंतू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची प्रतिमा अद्यापही लावण्यात आली नव्हती. म्हणूनच गणेश एकल व त्यांच्या सहकारी यांनी प्रतिमा भेट दिली.
यावेळी अॉल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष दिपक भोजने, उपाध्यक्ष मलिकाजुन कुरवार, गणेश एकल महिला आघाडीच्या प्रभा दूर्ग, डॉ.पोले, गोरख खामगळ, दवाखान्यातील कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group