पिंपरी (Pclive7.com):- भारतीय संस्कृतीत व येथील लोकजीवनाशी समरस झालेल्या सिंधी समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी व प्रश्नांसाठी मला केव्हाही आवाज दयावा, मी सेवेसाठी ‘कटीबद्ध आहे’ अशी ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
पिंपरी येथील अडवानी धर्मशाळेमध्ये सिंधी समाजाच्या वतीने दुसऱ्यांदा खासदार म्हणून ऐतिहासिक विजय मिळविल्याबद्दल बारणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरी विधानसभा समन्वयक माधव मुळे, बबलू उर्फ धर्मेंद्र सोनकर, राजू सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन लच्छु बुलाणी, किशोर केसवानी, विजय कोटवानी, महेश वाधवानी, सुशिल बजाज, गोल्डी बजाज, सत्तू तेजवानी, शमन तेजवानी आदींनी केले.






















Join Our Whatsapp Group