पिंपरी (Pclive7.com):- मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष तसेच शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक अगळा वेगळा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबविण्यात आला. युवानेते गणेश आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील गोरगरीब, अपंग व होतकरू महिलांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. मातोश्री ग्रुपच्या वतीने गेल्या ५ वर्षापासून हा सामाजिक उपक्रम होत आहे. गणेश आहेर यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पिंपरीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १३० महिलांना प्रत्येकी ५ किलो प्रमाणे तब्बल ७०० किलो धान्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धान्य वाटप करण्य उपस्थिती लावली. त्यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवडचे शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, नगरसेविका कोमल दिपक मेवानी, शिवसेना शहरप्रमूख योगेश बाबर, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अन्सार शेख, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, स्विकृत नगरसेविका वैशाली खाडे, शिवशाही व्यापारी संघ अध्यक्ष युवराज दाखले, शिवसेना विभागप्रमुख सुनिल पाथरमल, शिवसेना संघटक रोमी संधू, चिंचवड विधानसभा संघटक हरेष नखाते, जाणिव फाऊंडेशन अध्यक्ष अमर कापसे, शिवसेना पुणे शहरसंघटिका सुनिता खंडाळकर, पिंपरी कँम्प व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजू नागपाल, सेवा विकास बँकेची संचालक प्रकाश भारती, प्रल्हाद कांबळे. खंडू शिरसाठ, विशाल बाविस्कर, रमेश शिंदे, नितुल पवार, प्रदिप दळवी, रत्नप्रभा नवघरे, शुभांगी कदम, पौर्णिमा बर्गे, भाग्यश्री म्हस्के, शिल्पा अनपण, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, रविकिरण घटकार, माऊली जाधव, जितेंद्र चौधरी, रामू चायन्दास, नारायण खुशलानी, राहुल कदम व सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group