पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा युवासेनेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांनाचा सत्कार करण्यात आला. तसेच युवासेना पिंपरी (yuvasenapimpri.com) या वेबसाईटचे उद्घाटन आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड युवतीसेना अध्यक्षा प्रतिक्षा घुले, युवासेना विभागप्रमुख निलेश हाके यांनी केले होते.
युवासेना पिंपरी ह्या वेबसाईटवर पिंपरी विधानसभेतील सर्व नागरिकांच्या समस्यांचे निवारण होणार आहे. पिंपरी महापालिका, तहसील कार्यालय, अन्नधान्य कार्यालय, महावितरण, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या कामासंदर्भातील तक्रारी नागरिक करू शकणार आहेत. त्यांच्या तक्रारींचा पाठपुरवठा युवासेना पिंपरीतर्फे करून त्यांचे निवारण करण्यात येणार आहे.
या वेबसाईटच्या उद्घाटन प्रसंगी आमदार गौतम चाबुकस्वार, युवासेना विस्तारक वैभव थोरात, जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना गटनेते राहुल कालाटे, शिवभक्त अनिकेत घुले, उर्मिलाताई काळभोर,जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक भोंडवे, अनिता तुतारे, जिल्हा समन्वयक रुपेश कदम, समन्वयक रोमी संधु, युवासेना पिंपरी विधानसभा सेनाधिकारी अभिजीत गोफण, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष नितीन घोलप, उपविभाग संघटक सनी कड, राहुल पलांडे, शहर संघटिका वैशाली कुलथे, विभागसंघटिका भाग्यश्री म्हस्के,उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, ओंकार जगदाळे, सोन्या लांडे दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.