पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील कै. नागुभाऊ गतिराम बारणे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि. १९ जून रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते १२ या वेळेत या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच काही नागुभाऊ बारणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दि.१९ रोजी रक्तदान शिबिर दुपारी १ ते ४ या वेळेत संतोष मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन यांच्या पत्नी श्रीमती. राणुबाई नागुभाऊ बारणे, बाळासाहेब नागुभाऊ बारणे, नारायण नागुभाऊ बारणे, संतोष नागुभाऊ बारणे, सचिन नागुभाऊ बारणे यांनी केले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरास सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.