पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग २६ विशालनगर येथील कै.वामनराव जगताप विरंगुळा केंद्रामध्ये मोफत वाचनालयाचे उद्घाटन विद्यमान नगरसेविका स्थायी समिती सदस्या आरतीताई चोंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या मोफत वाचनालयामध्ये विविध पुस्तकांचे वाचन करण्याचा आनंद परिसरातील नागरिकांना घेता येणार आहे. या वाचनालयामुळे तरूणांच्या ज्ञानात भर पडणार आहे तर जेष्ठांना विरंगुळ्यास मदत मिळणार आहे. सदर कार्यक्रमात प्रभागातील जेष्ठ नागरीकांचा नारळ, गुलाबपुष्प व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी विशाल जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रंगनाथ थोपटे, सचिव बळीराम चौधरी, शालिनीताई गरुड, देशपांडेताई, वसंत आब्रे, रोहिदास गवळी, व्दारकानाथ खरे, लक्ष्मण गोसावी, व विशालजेष्ठ नागरीक संघाचे सदस्य,तसेच कस्पटेवस्ती जेष्ठ नागरीक संघाचे सभासद उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group