पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती या स्पर्धेचे आयोजक हर्षवर्धन भोईर यांनी दिली आहे.
‘पिंपरी चिंचवड आयडॉल’ या स्पर्धेस गेली ५ वर्षे अतिक्षय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यातील काही स्पर्धकांनी कलर्स वाहिनीवरील ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमामध्ये बक्षीस मिळविले आहे. या स्पर्धेमधून पुढे गेलेले अनेक कलाकार आज व्यावसायिक रंगमंचावर गायक म्हणून नाव कमवत आहेत. यंदाचे हे ६ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे फॉर्म सर्व्हे नं.१६४ “मनिषा स्मृती निवास” भोईर नगर चिंचवड येथे उपलब्ध असून फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख बुधवार ०३ जुलै २०१९ (वेळ सकाळी १० ते सायं ७.०० वा.) आहे. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक भाऊसाहेब भोईर हे असून आयोजन हर्षवर्धन भोईर यांनी केले अाहे. तर संयोजिका मानसी भाऊसाहेब भोईर आणि सुषमा बोऱ्हाडे या आहेत. अधिक माहितीसाठी ९८२२६०७६८७ आणि ९८२२३१३०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा वयोगट १५ ते ३५ वर्षे अाहे अशी माहिती हर्षवर्धन भोईर यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group