पवनानगर (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील पवनमावळ प्रांतातील तुंग किल्ला हा घाटरक्षक दुर्ग म्हणुन ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे, चढाई श्रेणीत सोपा समजला जाणारा किल्ला, पण या गडावरील मंदिरे गडावर जाण्याच्या मार्गाची तसेच तटबंदीची दुरावस्था झालेली आहे. आपल्या ऐतिहासिक वास्तु जपण्यासाठी व या किल्ल्याला शिवकालीन वैभव प्राप्त व्हावे म्हणुन गडाच्या पुर्णउद्धारासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने गड संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली होती. स्वराज्यातील तुंग उर्फ कठीणगडावरील मंदिरे, दरवाजे यांची दुरअवस्था झाली आहे. यामुळे याची पुर्नरबांधणी करणे आवश्यक होती. यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मावळ तालुक्याच्यावतीने किल्ल्यावरील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.

गडावरील तुंगाई देवीच्या मंदिराची पडझड झाली होती. बऱ्याच काळापासुन या मंदिराचा जिर्णोद्धार झाला नव्हता. विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाच्यावतीने या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. मंदिर जिर्णोद्धार कामाला सकाळी ६ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दिवसभर १३ मावळ्यांनी (वीर बजरंगीनी) मंदिराचे काम पुर्ण केले. मंदिराच्या कामासाठी लागणारे साहित्य २० फरश्या, ८ लोखंडी अँगल, वाळु, सिंमेट इत्यादी आणण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून मावळ्यांना चार वेळा गड चढ उतार करावे लागले. सांयकाळी ६.३० वाजता मंदिराचे काम पुर्ण झाले. तुंगवाडीच्या ग्रामस्थांनीही विशेष सहकार्य केले. शिवभक्तांनी गडकोटांच्या संवर्धनासाठी मोठ्या संख्येने गडसंवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने करण्यात आला.
मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी बजरंग दल जिल्हा मंत्री संदेश भेगडे, गोरक्षक पै.अमित भेगडे, पै.सचिन शेलार, विश्वास दळवी, सागर ठाकर सुभाष भोते, सुरेश ठाकर ,चेतन ठाकर, सचिन ठोंबरे, दत्ता ठाकर, साई डांगले, संतोष कुळवे, निलेश ठाकर, पवन भंडारी या मावळ्यांनी तुंग किल्याची मोहिम फत्ते केली. तसेच तुगंगावचे सरपंच वसंत म्हस्कर, पोलिस पाटील गणेश ठोबंरे व तुंग ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
विश्व हिंदु परिषद बजरंग दलाच्यावतीने गड किल्लेसंवर्धन मोहीम उपक्रमांतर्गत या अगोदर किल्ले लोहगडावर नंदी बसवण्यात आला. तिकोणा गडावरवर संवर्धानाचे काम करण्यात आले. विसापुर गडावरील पाण्याची टाकी स्वच्छ करून पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावाटे टाक्यांमध्ये माती जाऊ नये म्हणून टाक्यांभोवती तटबंदी करण्यात आली. आणि आता किल्ले तुंग गडावरील तुंगाई देवीच्या मंदिराचे काम करण्यात आले. गडसंवर्धनाचे काम विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे पुणे जिल्हा मंत्री संदेश भेगडे यांनी सांगितले.
किल्ले तुंग उर्फ कठीण गडावरील मंदिराची पडझड झाली होती. तर काही वर्षापुर्वी काही संस्थांच्या वतीने छोट्या-मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्यात आली होती. पण बऱ्याच वर्षानंतर या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असे ग्रामस्थांनच्या वतीने सांगण्यात आले. किल्ल्यावरील सर्व कामे इतिहास अभ्यासक व संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अश्या वेगवेगळ्या गडसंवर्धन मोहिमेत शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजेत असे मत सचिन शेलार यांनी व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group