पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी, तापरकीरनगर येथील काका इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात नर्सरी ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या दिंडी सोहळ्यात लहान विद्यार्थ्यांनी तुकाराम महाराजांची वेषभूषा परिधान केली होती. तर विद्यार्थीनींनी मुक्ताबाईंची वेशभूषा साकारली होती. तसेच सर्व लहान मुलेमुलीं वारकरी होऊन गळ्यात टाळ, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हातात भगव्या पताका घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते. या दिंडीचे नियोजन स्कूलचे चिप इंन्चार्ज प्रशांत रेड्डी सर, व उप मुख्यध्यापीका वंदना मॅडम, स्कूलचे संस्थापक नवीन तापकीर यांनी केले होते.
त्यावेळी स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना तापकीर, चिराग फुलसुंदर, गणेश भोसले व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group