पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे भारतीय युवकांसाठी प्रेरणादायक अाहे. संभाजीराजे यांचे बलिदान येणाऱ्या पुढील पिढ्यांना देखील स्फुर्ती देत रहावे यासाठी धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्मदिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहिर करावा. त्या दिवशी विविध ऐतिहासिक कार्यक्रमाची आयोजन केले जावे. या मागणीचे निवेदन पिंपरी विधानसभा युवासेनेतर्फे तहसील कार्यालय आकुर्डी येथे नायब तहसीलदार विकी परदेशी यांना देण्यात आले.
यावेळी शिवभक्त अनिकेत घुले (युवासेना मावळ तालुका प्रमुख), रुपेश कदम (जिल्हा समन्वयक), प्रतिक्षा घुले (युवती सेना अधिकारी), अभिजीत गोफण (युवासेना अधिकारी), निलेश हाके (विभाग संघटक), राजेश वाबळे (विभागप्रमुख), कामिनी शर्मा (विभाग संघटीका महिला), कल्पना जाधव (शाखा संघटिका), राहुल पलांडे (उपयुवा अधिकारी), अक्षय येळवंडे (युवासेना विभाग अधिकारी मावळ), ओंकार जगदाळे, अँड.अजित बोराडे, सनी कड, राहुल राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याविषयी निवेदन देण्यात येईल असे प्रतिपादन प्रतिक्षा घुले व निलेश हाके यांचे वतीने करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group