पिंपळे सौदागर (Pclive7.com):- प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर मधील विविध सोसायटी व घराघरातील ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वाहनांचे लोकार्पण व पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नारायण काटे, पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे, सागर भिसे, महापालिकाचे आरोग्य विभागाचे राकेश सोदाई, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलनाचे खाजगी ठेकेदारा देण्यात आले आहे. त्यासंदर्भात महापालिकेने ८ वर्षाचा करार केला आहे. या कचरा संकलनाकरिता नवी वाहने आज प्रत्येक प्रभागात दाखल झालीत.



















Join Our Whatsapp Group