पिंपरी (Pclive7.com):- देशाची एकता व अखंडतेसाठी आपले बलिदान देणारे, कोट्यावधी भारतीयांचे प्रेरणास्थान, राष्ट्रभक्त, थोर शिक्षणतज्ज्ञ व जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही स्वर्गीय डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन अटलबिहारी वाजपेयी विचार मंच, पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने काळभोरनगर, चिंचवड येथे करण्यात आले होते.
यावेळी स्वर्गीय डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला व भारतीय जनता पार्टीची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन पक्षाला बळकट करण्याचे आवाहनही करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माऊली थोरात, भिमा बोबडे, भाजपचे शहर सरचिटणीस प्रकाश जवळकर, शहर उपाध्यक्ष नंदू भोगले, दिपक कुलकर्णी, देवदत्त लांडे, प्रकाश हगवणे आदि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group