पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारीसंघाच्या मुंबई आणि ठाणे येथील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. शिवशाही व्यापारीसंघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली.
या बैठकीत कोकण विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निशीगंधा चुडजी, मानपाडा विधानसभा आझादनगरच्या अध्यक्षपदी मनिषा शेलार, लोकमान्यनगरच्या अध्यक्षपदी सुनिता सलते, तसेच वर्तकनगर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनिता हिलाल यांच्यावर सोपविण्यात आली.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघाचे मुंबई अध्यक्ष योगेश घोरपडे, कार्याध्यक्ष नरेश कुरले, विधी व न्याय विभाग अध्यक्षा श्रध्दा रूदो, चेंबुर विधानसभा अध्यक्षा प्रार्थना मिटना कानडे, विभाग अध्यक्ष कृष्णा गायकवाड, शाखाप्रमुख सातपुतेसर, राहुलदादा शिंपीआदी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group