पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. धर्मवीर संभाजी उद्यान ज्युबिली गार्डन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप, क्लबचे अध्यक्ष मोहन पाटील, सेक्रेटरी अनिल दांदडे पाटील, ट्रेझरर विक्रम माने, झेड सी राजेंद्र कोळी, गवई, सौ.श्रध्दा पेठे, सौ.सुजाता दांदडे, सौ.माने, सौ.गवई, गिता शर्मा, त्यागराजन, झोडगे, डाॅ.बाहेती, सत्यन भास्कर, व यमुनानगर जेष्ठ नागरिक संघ कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तरुण कार्यकर्ते सुशांत साळवी, आशिष दांदडे व मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी लायन्स क्लब प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, नगरसेवक सचिन चिखले, डॉ. बाहेती आदींनी मार्गदर्शन केले.






















Join Our Whatsapp Group