पिंपरी (Pclive7.com):- बीव्हीजी कंपनीचे संचालक हनुमंतराव गायकवाड यांची तब्बल साडे सोळा कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लँबोरेटिज लिमिटेड, अनघा फार्मा या कंपनीत त्यांनी आकर्षक परताव्याच्या अमीषाने गुंतवणूक केली होती. मात्र त्यात त्यांची फसवणूक झाली असून विनोद जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा जाधव (रा. विमाननगर, पुणे) यांच्या विरोधात गायकवाड यांनी चिंचवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांची तब्बल १प कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेडिको कंपनीत गंतवणूक करुन जास्तीचा परतावा देतो असे सांगून फसवणूक करण्यात आलेलीआहे. या प्रकरणी हणमंत रामदास गायकवाड (४६, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. तर विनोद रामचंद्र जाधव आणि सुवर्णा विनोद जाधव (दोघे रा.विमाननगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार २६ ते ३१ मार्च २०११ मध्ये चिंचवड येथील बीव्हीजी हाऊस मध्ये झाला. हनुमंत गायकवाड यांनी जाधव यांच्याकडे मेडिको कंपनीत गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्यानुसार जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड, आनघा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, बायोडिललेबोरिट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली, कंपनीने एक कोटी ५३ लाख ९५ हजार २२७ रुपयांचे समभाग दिले. मात्र आता प्रयत्न बाकी कोणताच परतावा दिला नाही.






















Join Our Whatsapp Group