पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत ६ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मोशी येथे रात्री पावने बाराच्या सुमारास घडली. अर्नव शिवशंकर सोलबने (वय – ६ वर्षे मुळ राहणार, लातूर) या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तर वडील शिवशंकर सोलबने हे गंभीर जखमी असून मोशी येथील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर डंपरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची कोणतीच दखली नसल्यामुळे मृत बालकांच्या नातेवाईकांनी पालिका आवारात टाहो फोडला. या अपघातात दोषी असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा. तसेच गंभीर जखमी असलेल्या शिवशंकर सोलबने यांचा उपचार महापालिकेने करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून मृताच्या नातेवाईकांना सोबत घेऊन त्यांनी आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शाम लांडे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group