पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही भागातील रस्त्यावर खड्डा पडला आहे. रस्ता खराब झाला आहे. कचरा साचलाय, स्वच्छता केली नसल्याचे तक्रार करण्यासाठी महापालिकेने एक व्हॉट्सअॅप नंबर दिला आहे. ९९२२५०१४५० नंबरवर ठिकाणाचे फोटो आणि माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका तत्काळ ही समस्या मार्गी लावणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात विशेषत: पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करणेकामी व परिसर साफ सफाईकामी महापालिका कटीबद्ध आहे. नागरिकांची असुविधा दूर व्हावी व त्यांनीकेलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कमीत कमी वेळेत उचित कार्यवाही व्हावी. महापालिकेने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.आपण वास्तव्यास असलेल्या भागात पावसाळ्यात खड्डे पडल्यास किंवा रस्ता खराब झाल्यास तसेच परिसर स्वच्छतेसाठी, अशा ठिकाणचे फोटो व संपूर्ण पत्ता इत्यादी माहितीसह महापालिकेच्या ९९२२५०१४५० या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठविण्यात यावे. नागरिकांच्या समस्याचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदर बाबतची तक्रार सारथी हेल्पलाईन नंबर ८८८८००६६६६ या दूरध्वनीवर नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.






















Join Our Whatsapp Group