पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत केक कापून व पिंपरी भाजी मंडई येथे स्वच्छता मोहीम राबवून, तसेच वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी युवा नेते पार्थदादा पवार, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, नगरसेविका उषाताई वाघेरे, निकिता कदम, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप,युवा नेते ऋषिकेश संजोग वाघेरे, तसेच आजी माजी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group