पिंपरी (Pclive7.com):- हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या हितेश मुलचंदानी या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.२२) पहाटे पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरीमधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.
आज सकाळी येथील व्यापाऱ्यांनी हातात ‘वुई वॉन्ट जस्टीस’ ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ असे फलक घेऊन निदर्शने केली. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, हितेशच्या मित्रांचे पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याच्या मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत कुणाल हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले. चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा मृत्यू झाला.





















Join Our Whatsapp Group