पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपीं विरुद्ध आरोपपत्र दाखल करावे. तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी यासाठी प्रख्यात वकिलांची नियुक्ती व्हावी अशी मागणी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी व युवासेना पिंपरी यांनी सांगवी पोलीस स्टेशनला संध्याकाळी भेट दिली व मृत मुलीच्या आई-वडिलांना भेटून धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून आरोपींना फाशी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे आश्वासन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, स्वरुपा खापेकर, वैशाली कुलथे, शशिकला उभे, कामिनी मिश्रा, विभाग संघटक निलेश हाके, रवि नगरकर, राज पिसाळ, ॲड.अजित बोराडे, उषा आल्हाट, अनुजा कुमार, विवेक तितरमारे, निर्मली पाटील, नैना गोळे, शिल्पा अनपन, श्वेता कापसे, अनुराधा आहेर, शैला निकम आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group