पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तो तातडीने सुरळीत करावा तसेच या भागात वीजबिल वाटप नियमित पणे होत नाही. मीटर रीडिंग न घेताच नागरिकांना बिले देण्यात येतात. तरी लवकरात लवकर या तक्रारींचे निवारण करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे कार्यकारणी सदस्य गणेश लंगोटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
चिंचवड स्टेशन परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. हा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा तसेच या भागातील ग्राहकांना वीज बिल नियमितपणे मिळत नाही. मिटर रिडींग न घेताच सरासरी स्वरुपात बिल दिले जाते. आणि त्यानंतर एखाद्या महिन्यात रिडींग घेऊन एकदम बिल दिले जाते. त्यामुळे एकाच वेळी मोठी रक्कम भरणे ग्राहकाला अशक्य होते. एकदम भुर्दंड सोसावा लागतो.
तरी प्रत्येक महिन्याला रिडींग घेऊनच विज बिल मिळावे. व देय तारखेच्या आधी मुदतीत मिळावे जेणेकरून दंडाची रक्कम भरावी लागणार नाही. व वीज बिल देय तारखेनंतर भरल्याने प्रत्येक वेळेस पुढील बिलामध्ये रक्कम अदा करण्यासाठी जावे लागणार नाही. अशा मागणीचे निवेदन गणेश लंगोटे यांनी भोसरी विभाग महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.






















Join Our Whatsapp Group