पिंपरी (Pclive7.com):- जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी मिळून एकावर खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली. फईम जमाल शेख (वय ४२, रा. महादेवनगर, चिखलीगाव) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा फईम शेख (वय ३३) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, असिफ चाँद शेख (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्याच्या तीन साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फईम शेख आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फईम यांना लाकडी दांडक्याने मारले. यामध्ये फईम यांच्या डोक्याला, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group