पिंपरी (Pclive7.com):- मोशी गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जाणीव परिवार या सामाजिक संस्थेचे संस्थापक (सीए) शांताराम बबनराव आल्हाट (वय ७०) यांचे शनिवारी दि.२१ रोजी दुख:द निधन झाले आहे.
मोशीतील पहिले चार्टट अकाऊटंट होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. सहकार क्षेत्रात त्यांची मोलाची कामगिरी होती. अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. जाणीव परिवार या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २०० अनाथ व होतकरू मुलांना मदतीचा हात दिला होता. त्यांच्या निधनाने मोशीगाव व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मोशी येथील इंद्रायणी नदीच्या तीरावर शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी दशक्रिया विधी करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group