पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील बीआरटी मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीेने कोणत्याची उपाययोजना या मार्गावर केल्या नाहीत. ट्राफिक वॉर्डन या ठिकाणी नेमले असताना देखील सर्रासपणे खाजगी वाहने या मार्गावर धावत असतात. त्यासंदर्भात महापालिकेने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून बीआरटी मार्गावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड युवासेनेकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात युवासेनेने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. युवती अधिकारी प्रतीक्षा घुले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने हे निवेदन दिले. यावेळी सागर एकनाथ शिंदे संघटक-भारतीय विद्यार्थी सेना, ओंकार राजेंद्र पवार, निलेश हाके पिंपरी विधानसभा विभाग संघटक, ओंकार जगदाळे उपस्थित होते.
युवासेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग बनवले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये या मार्गात पालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे अपघात रोखण्यासाठीची उपाययोजना केल्याते दिसून येत नाही. आजपर्यंत अनेकांचे प्राण यामार्गामुळे गेलेले आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिका प्रशासनाने बीआरटी मार्ग पीएमपीएमएल बसेससाठी प्रस्थापित केलेला आहे. त्या मार्गावरती सर्सास खाजगी वाहनांचा वावर दिसून येत आहे. त्याच कारणास्तव शहरातील सर्वच बीआरटी मार्गावर सुरक्षेसाठी वार्डन नेमलेले आहेत. तरी देखील बीआरटी मार्गाचा वापर खाजगी वाहने करत आहेत. भविष्यातील संभाव्य धोक्याचा विचार करून तात्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात सक्त ताकीत द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group