विकासकामांबाबत सकारात्मक दृष्टीकोन; दिवसेंदिवस वाढतोय पाठींबा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी या राखीव विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यादरम्यान प्रचंड शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाचा धसका विरोधकांनी घेतल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, भोसरी व पिंपरी असे तीन मतदारसंघ आहेत. यातील पिंपरी मतदारसंघ राखीव आहे. शहरातील सर्वाधिक इच्छुक याच मतदारसंघात असून, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेखर ओव्हाळ यांनी इच्छुक उमेदवार म्हणून जोरदार तयारी केली आहे. तरुण, मनमिळावू स्वभावर आणि विकासकामांबाबत त्यांनी घेतलेली भूमिका व धमक यामुळे ते मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार ठरले आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद आश्चर्यचकीत करणारा ठरू लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळेवाडी येथे मेळावा घेण्यात आला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन केले. या वेळी शेखर ओव्हाळ यांनीही शक्तीप्रदर्शन केले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी ओव्हाळ यांना दिलेला पाठींबा हा मेळाव्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरला. विशेष बाब म्हणजे या कार्यकर्त्यांमध्ये महिला भगिनींसह, अबालवृद्ध आणि तरुणांची गर्दी हा चर्चेचा विषय ठरला.
पिंपरी मतदारसंघ राखीव असून, संमिश्र स्वरुपाचा आहे. झोपडपट्टी, गावठाण, तसेच निगडी प्राधिकरणासारखा विकसित भाग या मतदारसंघात येतो. तसेच कामगार वर्गही या मतदारसंघात मोठ्या संख्येने आहे. या सर्व घटकांचे प्रश्न भिन्न आहेत. यापूर्वी अनेकांना संधी मिळूनही पिंपरी मतदारसंघात अपेक्षित विकास साधण्यात सत्ताधार्यांना अपयश आले आहे. त्यामुळे शेखर ओव्हाळ यांना दिवसेंदिवस पाठींबा वाढत असल्याचे बोलले जात आहे. शेखर ओव्हाळ यांनी केलेले शक्तीप्रदर्शन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली दाद आणि पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा त्यांना असलेला पाठींबा या जोरावर ओव्हाळ हेच राष्ट्रवादीचे उमेदवार ठरणार हे निश्चित झाल्याची चर्चा आहे.





















Join Our Whatsapp Group