पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथे खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून नागेश जमादार या युवकाचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नागेश यांच्या पश्चात आई-वडील व चार बहिणी असा मोठा परिवार होता. सध्या त्यांच्यावर उदर्निवाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. म्हणूनच मावळचे खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी नागेश यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना तातडीची आर्थिक मदत केली.
यावेळी उपजिल्हासंघिटका स्वरूपा खापेकर, उपविभागप्रमुख एकनाथ हाके, युवती अधिकारी अधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, नंदू काची, विकास गायकवाड, सिद्धार्थ पगारे, लक्ष्मण शिवशरण, प्रताप शीरशेट्टी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group