पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवार दि.२२ रोजी स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बालजत्रा, ऑटो रिक्षा सौंदर्यवती स्पर्धा तसेच होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा या कार्यक्रमांचे आयोजन दापोडी येथील शितळादेवी चौक, कुस्ती मैदान येथे करण्यात आले आहेत.

दापोडी प्रभागाचे कार्यक्षम नगरसेवक रोहित आप्पा काटे यांचा वाढदिवस रविवार दि.२२ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नगरसेवक रोहित आप्पा काटे मित्र परिवाराच्या वतीने त्यानिमित्त विविध स्पर्धा तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दापोडी येथील शितळादेवी चौक येथे दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजता ऑटो रिक्षा सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. यंदाच्या वर्षी अनेक नाविन्यपूर्ण रिक्षा यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ११ नंबर बसस्टॉप, कुस्ती मैदान दापोडी येथे होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा हा खास महिलांकरिता विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. अक्षय घोळवे हे सेलिब्रिटी या कार्यक्रमाचे एंकरिंग करणार आहेत. तसेच या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकिवणाऱ्या महिलेला मानाची पैठणी व दुचाकी गाडी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तर दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही आणि पैठणी, तिसरे बक्षीस वॉशिंग मशीन व पैठणी, चौथे बक्षीस फ्रिज व पैठणी, पाचवे बक्षीस मायक्रो ओव्हन व पैठणी असे असणार आहे. तर या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देखील दिली जाणार आहे. दरम्यान सायंकाळी ७ वाजता येथे बालजत्रा देखील आयोजित करण्यात येणार आहे. यात लहान मुलांना विविध प्रकारची खेळणी तसेच खाऊगल्ली देखील उपलब्ध असणार आहे.
तसेच मधुमेह मुक्त भारत अभियानाअंतर्गत मोफत रक्तशर्करा तपासणी शिबिर व मधुमेह एक समज-गैरसमज व योग्य उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नगरसेवक रोहित अप्पा काटे यांचे कार्यालय याठिकाणी रविवारी दि.२२ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात होत असलेल्या कार्यक्रमांचा तसेच शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group