पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडीतील कोकणेनगर येथील भाग्यवंती देवी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले. यावेळी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विद्याश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या ओम ब्लड बँकतर्फे रक्त संकलित करण्याचे कार्य करण्यात आले. यावेळी डॉ.मयूर पाटील व डॉ.सायली नागरे उपस्थित होत्या.
प्रत्येकाने केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण आपण वाचवू शकतो, ही संकल्पना सर्वांमध्ये रुजली पाहिजे. ह्या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय वायुदल सैनिक राहुल पाटील यांच्यामार्फत करण्यात आले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पवार, मंडळाचे विनायक राजगुरू, आकाश सगर, अन्सार मुल्ला, राहुल पवार, विनायक श्रीवास्तव, अक्षय साळे, राजदीप साबळे, श्री.शानु ,श्री.रुद्रा यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.