
पिंपरी (Pclive7.com):- ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवराज कोकाटे, सरिता साने, नाना काळभोर आदी सहभागी झाले होते. भाजपच्या आजारी मानसिकतेचा धिक्कार असो, ‘जाहीर निषेध, जाहीर निषेध’ असे फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group